✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report

abp majha web team  |  03 Mar 2026 10:24 AM (IST)
ABP News

अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसतोय.... नाशिकहून दुबईला जाणारा कांदा बंदरातच अडकलाय...पश्चिम आशियात रमजानच्या दिवसात जळगावमधून मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जातात.. मात्र यंदा युद्धामुळे ते अशक्य होऊन बसलंय.. आणि जर युद्ध लांबलं तर यावेळी हापूस आंब्याची आखातवारी देखील रखडण्याची चिन्ह आहेत.. पाहुयात युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कशी संक्रांत ओढावली आहे ते...



म्हणून युद्ध नको... तर बुद्ध हवा....


युद्धामुळे कांद्याचा कंटेनरमधला मुक्काम वाढला


नाशिकमधला कांदा उत्पादक मोठ्या अडचणीत


जळगावच्या केळीची आखाती देशातली निर्यात ठप्प


रमजानमध्ये केळीला मोठी मागणी, पण युद्धामुळे गणित फिस्कटलं


युद्ध संपू दे... हापूस उत्पादकांचं देवाला साकडं


कृषीमालाची निर्यात रखडली, शेकडो कोटींचा फटका


एप्रिल उजाडताच दुबई, ओमान, बहारीन, कतार, इराण या देशातील खवय्यांना वेध लागतात ते..


आपल्या कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे..


सीझनमध्ये दिवसाला ६० ते ७० टन हापूस आखाती देशात पाठवला जातो


मात्र युद्ध जास्त काळ चाललं तर हापूसची निर्यात कशी करायची असा प्रश्न आत्तापासूनच निर्यातदारांना सतावतोय..


त्यामुळे आंब्याचा सीझन सुरू होण्याआधीच युद्धाचा दी एन्ड झाला पाहिजे, असं गाऱ्हाणं कोकणातला हापूस उत्पादक आणि निर्यातदार नक्कीच घालत असणार


प्रश्न फक्त कांदा, केळी आणि हापूसचा नाहीय..


तर इतर पश्चिम आशियातील देश हे इतर कृषीमालाची मोठी बाजारपेठ आहे


पण युद्धामुळे सगळ्याच कृषीमालाची आखाती देशात होणारी निर्यात ठप्प झाल्यामुळे दीडशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे..


आणि युद्ध जास्त काळ लांबल्यास हा आकडा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत


सोनं आणि चांदी आधीच सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट बनत चाललीय..


युद्धांचे संकेत मिळताच गुंतवणूकदार शेअर बाजारातून माघार घेत सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात..


त्यामुळे साहजिकच दोन्ही धातू पुन्हा एकदा विक्रमी दर गाठण्याची शक्यता अधिक आहे...


त्यामुळे लग्न असलेल्या घरांना बजेट पुढे मागे करण्याची  तयारी ठेवावी लागणार आहे..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.