Nagpur Murder : नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या : Special Report
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 28 Jun 2021 12:16 AM (IST)
नागपूर : नागपूरच्या पाचपावली परिसरातील बागल आखाडा जवळ एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आहे. धक्कादायक म्हणजे त्याच कुटुंबातील आलोक मातूरकर नावाच्या 40 वर्षीय आरोपीने या सर्व हत्या केल्या असून हत्याकांडानंतर त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. पत्नी, मुलगी, मुलगा, मेहुणी आणि सासू यांची हत्या आरोपीने केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.