Gulabrao Patil Statement : मतांसाठी नोटा, लोकशाहीची थट्टा; मंत्र्यांकडे 'माल' म्हणून लोकशाही बेहाल? Special Report
Gulabrao Patil Statement : मतांसाठी नोटा, लोकशाहीची थट्टा; मंत्र्यांकडे 'माल' म्हणून लोकशाही बेहाल? Special Report
पाणीपुरवठा मंत्री असल्यानं, लक्ष्मी गुलाबराव पाटलांच्या घरात पाणी भरतेय?
की शिवसेनेकडे नगरविकास खातं असल्यानं मंत्र्यांच्या तिजोरीचा भरपूर विकास झालाय?
हे रोखठोक प्रश्न, सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाबराव पाटलांना आणि कदाचित एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या सगळ्याच मंत्र्यांना बोचतील...
मात्र हे प्रश्न उपस्थित करण्याची संधी दिलीय ती स्वतः गुलाबराव पाटलांनीच
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी महोदयांची नाशिकच्या भगूरमध्ये सभा होती..
मतदानाच्या एक दिवस आधी, लक्ष्मीला कसं प्रसन्न करायचं? याचा कानमंत्र गुलाबराव पाटलांनी दिला..
मतदारांवर लक्ष्मी प्रसन्न होण्याआधी, तीची कृपा नेत्यांवर झाली पाहिजे...
आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर लक्ष्मी का प्रसन्न आहे याचं गुपित देखील गुलाबराव पाटलांनी जगजाहीर करून टाकलं
पैसे वाटण्याचं आमिष दाखवून मतं मागणं हा आचारसंहितेचा भंग आहे...
हे पाच वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेल्या आणि अनेकवेळा मंत्रिपदं उपभोगलेल्या गुलाबराव पाटलांना वेगळं सांगण्याची गरज नाही...
मात्र आपलं कुणीच काही बिघाडू शकत नाही, या वृत्तीतूनच त्यांनी मतदारांना लक्ष्मी दर्शनाचं आमिष दाखवण्याचं धाडस केलेलं दिसतंय...
एखादा नेता चुकला, तर कान पकडणं हे पक्ष प्रमुखाचं काम असतं..
मात्र गुलाबराव पाटलांना पाठिशी घालताना, त्यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय अर्थ काढलाय? तुम्हीच ऐका...
खरं तर शिंदेंची शिवसेना चुकली तर विरोधकांआधी सध्या भाजपच त्यावर बोट ठेवतं
मात्र गुलाबराव पाटील थोडे लकी ठरले...
त्यांच्या लक्ष्मीदर्शनाच्या वक्तव्यात चंद्रशेखर बावनकुळेंना काही वावगं वाटत नाही...