चिपळूणमध्ये बाप्पाच्या मूर्ती डोळ्यादेखत पाण्यात, पुरामुळे कारखान्यात पाणी शिरून लाखोंचं नुकसान
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा | 31 Jul 2021 09:19 PM (IST)
गणेशोत्सव हा कोकणी आणि हिंदू धर्मियांचा महत्वाचा उत्सव असून अनेकांची श्रद्धा या उत्सवाशी जोडलेली आहे. त्यातच, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये हजारो कारखानदार आणि कामगारांची उपजीविका ही याच गणेशाच्या मूर्त्यांच्या उद्योगावर अवलंबून आहे. त्यातच , गेल्या वर्षभरात झालेली वादळ आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता आलेल्या महापुरामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर लाखोंचा तोटा या कारागिरांना झाला आहे.