Latur Fake Suicide Notes | आरक्षणासाठी 'बनावट' चिठ्ठ्या, Latur मध्ये धक्कादायक खुलासा
abp majha web team | 08 Oct 2025 11:26 AM (IST)
राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधित व्यक्तींनी स्वतः लिहिलेल्या नसून त्या बनावटपणे लिहिलेल्या असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. आरक्षणासाठी शासनावर दबाव आणून आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी अशा बनावट चिठ्ठ्या तयार करून वापरण्यात आल्या होत्या. लातूरच्या अहमदपूर, निलंगा आणि चाकूर तालुक्यांतील या तीन प्रकरणांमध्ये आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात बनावट चिठ्ठ्यांचा प्रकार निष्पन्न झाल्याप्रकरणी पहिल्यांदाच अशी कारवाई केली जात आहे. "आरक्षणासारख्या गंभीर सामाजिक आणि कायदेशीर मुद्द्याचं अशाप्रकारे भांडवल करणं अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह आहे," असं या प्रकरणी समोर आलं आहे.