Edible Oil Prices Rise | तेलाचा भडका, सर्वसामान्यांना चटका Special Report
एबीपी माझा वेब टीम | 17 Mar 2021 08:46 PM (IST)

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या पाठोपाठ खाद्य तेलांचे दर देखील भडकले आहेत. दिवाळीपासून खाद्य तेलांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी 80-90 रुपये प्रतिकिलो असलेले खाद्य तेलांचे दर यंदा 140 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत.