Covid 19 Vaccination : लस घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा! लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचं प्रमाण अत्यल्प
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 22 Apr 2021 10:34 PM (IST)
आतापर्यंत राज्यातील 1.2 कोटी नागरिकांना कोरोनाच्या लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तसेच जवळपास 15 लाख नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूट राज्याला कशा प्रकारे लस पुरवठा करणार यावर मुख्यमंत्री आणि अदर पुनावाला यांच्यात चर्चा झाली आहे. यावेळी कोरोना लसीच्या किंमतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येतंय.