Pune Vaccination : पुणे...लशींचं माहेरघर! पुण्याच्या मांजरीत आता कोवॅक्सिनचा प्लांट : Special Report
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 14 May 2021 11:28 PM (IST)
पुणे : पुण्याजवळच्या मांजरी बुद्रुक गावामध्ये सिरम इन्स्टिट्यूट कडून कोविशील्ड लसीची निर्मिती होत असताना आता शेजारीच असलेल्या मांजरी खुर्द गावामध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीची देखील निर्मिती होणार आहे. येत्या तीन ते साडे तीन महिन्यांमध्ये भारत बायोटेककडून मांजरी खुर्द गावामध्ये कोरोनावरील लसीची निर्मिती सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लस निर्मितीचा वेग प्रतिमहिना दीड ते अडीच कोटी डोस इतका वाढवण्यात येणार आहे. 70 च्या दशकात मांजरी खुर्द गावातील वन विभागातील जागा लस निर्मितीसाठी इंटरनेट इंडिया या कंपनीला देण्यात आली.