CM Eknath Shinde Worli Sabha Special Report : मुख्यमंत्र्यांच्या संभेनंतर रिकाम्या खुर्च्यांची चर्चा
abp majha web team | 08 Feb 2023 10:50 PM (IST)
CM Eknath Shinde Worli Sabha Special Report : मुख्यमंत्र्यांच्या संभेनंतर रिकाम्या खुर्च्यांची चर्चा
आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीत आले खरे... त्यांचा या ठिकाणी जाहीर नागरी सत्कारही झाला... मात्र या कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे गटाला डिवचलंय.... खरंतर आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे गट आणि भाजप इथे जोरदार शक्तीप्रदर्शन करेल असं वाटत होतं. पण सभेला गर्दीच झाली नाही... शिवाय सभेसाठी मैदानावर लावलेल्या खुर्च्या काढण्याची नामुष्की आयोजकांवर आली...सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.. यावरुनच आता मविआनं भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टोला लगावलाय.