Bollywood Drugs Case : ड्रग्जची नशा, बॉलिवूडची दशा? 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवे गौप्यस्फोट Special Report
Bollywood Drugs Case : ड्रग्जची नशा, बॉलिवूडची दशा? 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवे गौप्यस्फोट Special Report
२५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. मुंबई पोलिसांनी शक्ती कपूर यांचा मुलगा आणि श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरची काल पाच तासांहून जास्त वेळ चौकशी केली तर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ऑरीची आज तास चौकशी करण्यात आली. ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेला आरोपी सलीम शेखच्या जबाबात एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टीे समोर येत आहेत. पाहुयात
हटके कपड्यांसाठी...
आणि अतरंगी रील आणि व्हिडीओसाठी ओळखला जाणारा ऑरी...
बड्या सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये हमखास दिसणारा ऑरी...
मात्र याच ऑरीची २५२ कोटींच्या ड्रग्स प्रकरणी, अंमलीपदार्थ विरोधी पथकानं पाच तास चौकशी केली..
पोलिसांच्या हाती लागलेल्या सलीम शेखनं तपासादरम्यान धक्कादायक खुलासे केलेत..
ज्यामुळे फक्त ऑरीच नव्हे तर चंदेरी आणि राजकीय दुनियेतल्या बड्या चेहऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागू शकतं
या सगळ्यांची नाव घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे..
धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलीस ज्या ड्रग्स प्रकरणाची चौकशी करत आहे ती दाऊद इब्राहिमच्या डी गँगशी संबंधित आहे..
बॉलीवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन याआधी देखील उजेडात आलंय..
मात्र कुणावर ठोस कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही...
आता तपासानंतर बॉलिवूडचे कोणकोणते चेहरे गजाआड होणार आणि कोण या प्रकरणातून सुटणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल
सूरज सावंत, एबीपी माझा मुंबई