सुसंस्कृत पुण्यात अंधश्रद्धेचा बाजार! मुठा नदीकाठी झाडांवर काळ्या बाहुल्या,लिंबू-मिरची,अनेकांचे फोटो
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 08 Jun 2021 11:34 PM (IST)
पुणे : पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार पाहायला मिळाला आहे. नदीच्या कडेला असलेल्या झाडांना काळ्या बाहुल्या, बिबवे, लिंबू आणि ज्या व्यक्तीवर ती करणी करायची आहे अशा व्यक्तींचे फोटो ठोकण्यात आले आहेत. एक नाही तर अनेक झाडांना अशा प्रकारे या बाहुल्या ठोकण्यात आल्या ना अंधश्रद्धेचा हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.