Beed : एका रात्रीत तब्बल 140 गाढवं गायब, परळी शहरातून रातोरात गाढवं चोरीला
गोविंद शेळके, एबीपी माझा | 01 Nov 2021 10:45 PM (IST)
बीड : सध्या शहरी बरोबरच ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे असे असतानाच बीडच्या परळी मध्ये मात्र चक्क गाढवांच्या चोरीची तक्रार नोंदवण्यात आलीय. परळी शहरातील तब्बल 140 गाढव चोरीला गेले असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलीय.