Champa Singh Thapa Special Report: बाळासाहेबांची 'सावली' आता शिंदेंसोबत! ABP Majha
abp majha web team | 26 Sep 2022 11:02 PM (IST)
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सेवेकरी चंपासिंग थापा आणि बाळासाहेबांचे एका जमान्यातील सहाय्यक मोरेश्वर राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. थापा आणि राजे यांचा शिंदे गटातला प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय धक्का नसला तरी या घडामोडीला एक भावनिक किनार नक्कीच आहे. कारण शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत आधी ऐतिहासिक बंड घडवून आणलं आणि मग राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राज्यातल्या विविध शहरांमधल्या शिवसैनिक आणि स्थानिक नगरसेवकांना फोडून आपल्या बाजूनं वळवलं