Aurangabad : औरंगाबादमध्ये कोविडमुक्त गावात शाळेची घंटा वाजली, दीड वर्षांनी विद्यार्थी शाळेत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 15 Jul 2021 08:04 PM (IST)
औरंगाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून केवळ ग्रामीण भागातल्या शाळेची घंटा वाजेल. ज्या गावांमध्ये 16 जून नंतर कोरोनाचे रुग्ण नाही,त्याच गावातील शाळा सुरू करण्याची परवानगी आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेणे गरजेचे आहे.आठवी ते बारावीचे ग्रामीण भागात वर्ग असलेल्या शाळांची संख्या 852 आहे.- आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या गावांची संख्या 595 असून 16 जून नंतर कोविड रुग्ण नसलेल्या गावांची संख्या 446 आहे. याच गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.