Amol Kolhe Horse Riding : घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी, खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी शब्द पाळला
नाजिम मुल्ला, एबीपी माझा | 16 Feb 2022 10:52 PM (IST)
Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झाले होते. अखेर त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात आयोजीत केलेल्या शर्यतीत ते घोडीवर बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे पालन करणाऱ्या सर्व बैलगाडा शर्यत मालकांचे तसेच शौकिनांचे आभार मानले. देशातील पहिला खासदार आज बैलगाडा घाटात घोडीवर बसल्याचे देशाने पाहिल्याचे मला पत्रकारांनी सांगितले. अमोल कोल्हे घोडीवर बसल्याचे कौतुक नाही तर बैलगाडा शर्यत ही राज्यात, देशात लोकप्रिय झाली पाहिजे असे कोल्हे यावेळी म्हणाले.