Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आजारपणामुळे काही काळ राजकारणापासून दूर झालेयत. त्यामुळे हल्ली सकाळी त्यांच्या पत्रकार परिषदा होत नाहीत... मात्र आता त्यांची जागा घेतलीये... विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी... उद्धव ठाकरेंनी दानवेंवर एक मोठी जबाबदारी दिली आहे आणि थेट संजय राऊतांना दिलेलं काम दानवेंवर सोपवलंय.. पाहूयात...
ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज
आणि नेतृत्वाचं कवच म्हणजे संजय राऊत
राजकीय ताल धरण्याऐवजी थेट ढोल फोडून उत्तर देणारा नेता म्हणजे संजय राऊत
विरोधकांना भिडणारी आणि वेळप्रसंगी मित्रपक्षांनाही अंगावर घेणारी व्यक्ती म्हणजे संजय राऊत
मात्र आजारानं ग्रासल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या मुलुख मैदानी तोफेनं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला... तब्येतीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी संजय राऊतांनी राजकारणापासून स्वतःला थोडसं दूर ठेवलंय.. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला... तो म्हणजे संजय राऊतांप्रमाणे पक्षाची भूमिका प्रखरपणे कोण मांडणार? आणि या प्रश्नाचं उत्तर सापडलं संभाजीनगरमध्ये...