Amarnath Yatra 2025 : जम्मू-काश्मीर अमरनाथ यात्रेसाठी सज्ज Special Report
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर अमरनाथ यात्रेसाठी सज्ज झाला आहे. येत्या ३ जुलै रोजी यात्रेकरूंचा पहिला जथ्था बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी पोहचणार आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या दोन मार्गांपैकीचा एक मार्ग पहलगामहून जातो. अशा पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे, पाहूया त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट....
अमरनाथ यात्रा...
गेली अनेक दशकं अध्यात्मिक महत्व असलेली
हिंदू अस्मितेचं प्रतीक असलेली ही यात्रा...
पण अनेकदा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद
जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद्यांकडून केली जाणारी बहिष्काराची भाषा…
या सगळ्याला सामोरं जात अमरनाथ यात्रा
आणि जगभरातून अमरनाथला जाणाऱ्या श्रद्धाळूंचा प्रवाह
अव्याहतपणे सुरू आहे …
((व्हिज्युअल्स.... अमरनाथ))
यंदा येत्या ३ जुलैपासून
अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे....
त्यासाठी १४ एप्रिलपासूनच नोंदणी सुरु झाली होती...
आतापर्यंत लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे...
त्यामुळे अमरनाथ यात्रेकरूंचा उत्साह यंदाही कायम असल्याचं दिसलं...
मात्र तरीही २२ एप्रिलला पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे
१० टक्के नोंदणी कमी झाल्याचं जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल
मनोज सिन्हा म्हणालेयत....
बाईट - मनोज सिन्हा, नायब राज्यपाल, जम्मू काश्मीर
((Link for reference -
https://youtu.be/twdIU0QCdjE?si=gQXBYujs_OHtLOhm))
अमरनाथ यात्रेसाठी दोन मुख्य मार्ग आहेत...
पहिला पहलगाममधून सुरु होणारा मार्ग
हा मार्ग ४८ किलोमीटरचा आहे
तर दुसरा बालटाल मार्ग १४ किलोमीटरचा…
पहलगामपासून सुरु होणारा प्रवास ३ ते ५ दिवसात पूर्ण होतो
बालटाल मार्ग कमी अंतराचा आहे....
पण तो खडतर आहे त्यामुळे या मार्गावरुनही दोन दिवस लागतात...
((ग्राफिक्स इन))
अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षासज्जता
-----------------------------------------
३५ हजारपेक्षा अधिक जवान तैनात
के९ युनिट्स, ड्रोनची यात्रामार्गावर नजर
क्विक अॅक्शन टीम्स
बॉम्ब डिफ्युजल स्क्वॉड तैनात
सुरक्षेसाठी प्रथमच जॅमरचा वापर
यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्र
अँटी ड्रोन सिस्टम
((ग्राफिक्स आऊट))
अशी सुरक्षासज्जता असेल....
मात्र सुरक्षेसाठीच यात्रेकरुंना
हेलिकॉप्टर वापरासाठी मात्र मनाई करण्यात आली आहे....
((व्हिज्युअल्स....))
अमरनाथ यात्रेवर दरवर्षी दहशतवादाचं सावट असतं...
यंदा पहलगाम हल्ल्यानंतर हा धोका जास्त वाढलाय...
पण तरीही देशभरातून दरवर्षी अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंनी
यंदाही या दहशतीला न जुमानता
यात्रा पूर्ण करण्याच्या निर्धार व्यक्त केलाय....
बाईट - यशवंत वैदू, अमरनाथ सेवा संघ
बाईट - शंकर हजारे, अमरनाथ यात्रेकरू
बाईट - यात्रेकरु
((माझं ३ जुलैच दर्शन आहे
माझ्याकडे पुरावा म्हणून ही परची आहे
यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांनो जोशात या))
Reporter END PTC