Samruddhi Accident Families Special Report:समृद्धीवर अपघात, कुटुंबावर घात, 25 मृत्यूंना जबाबदार कोण?
abp majha web team | 01 Jul 2023 11:31 PM (IST)
कुणी कॉलेजसाठी निघालं होतं.. कुणी नोकरीच्या शोधात तर कुणी नातेवाईकांकडून घराकडे निघालं होतं.. कारणं वेगवेगळी होती पण मार्ग सारखाच होता... पुन्हा लवकर येवू असं सांगून आपल्या माणसांचा निरोप घेवून ही मंडळी निघाली प्रवासाला.. पण हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला.. ३० तारखेचा दिवस संपून १ तारखेचा दिवस सुरु होत होता.. आणि हीच मध्यरात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली.. असं म्हणतात प्रत्येकाच्या नशिबाची रेघ वेगवेगळी असते.. पण या बसने प्रवास करणाऱ्या २५ जणांच्या नशिबाची रेघ सारखीच होती..