'गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणातील आरोपी अब्दुल रौफ दयेच्या लायक नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 02 Jul 2021 12:18 AM (IST)
मुंबई : नव्वदच्या दशकात उदयास आलेल्या टी-सीरीज कंपनीचे मालक आणि 'कॅसेटकिंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आपला प्रलंबित निकाल दिला आहे. या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट या मारेकऱ्यानं मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात दिलेलं आव्हान फेटाळून लावण्यात आलंय. मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही असं सांगत न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.