राज्यातील 25 हजार शिक्षक टीईटी उत्तीर्ण नसल्याने अडचणीत,नोकऱ्या टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 28 Jun 2021 09:18 PM (IST)
औरंगाबाद : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या राज्यातील जवळपास 25 हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आल्यानंतर आता शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर दुसरीकडे टीईटी पात्र शिक्षकही रिक्त जागेवर आम्हाला नियुक्त्या द्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.