Saat Barachya Batmya :7/12: पावसाने फिरवली पाठ, बळीराजा संकटात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 07:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात पावसाने लपाछपीचा खेळ मांडलाय जणू... कारण राज्यातील काही भागांत आठ-आठ दिवस सूर्य दिसत नव्हता आणि पावसाच्या सरी थांबायचं नाव घेत नव्हत्या... तर दुसरीकडे, निळशार आभाळ... ढगाचा मागमूसही नाही... चुकून एखादा ढग आलाच, तर त्याकडे आशेने बघता-बघता, तो कुठल्या कुठं निघून गेलेला असतो... त्यामुळे शिवारांना अजून हिरवा शालू मिळालेलाच नाही आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या सुरकुत्याही कमी झालेल्या नाहीत... पाहूयात, पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी कसे दशावतार आलेत... या रिपोर्टमधून...