World's Largest Camera | Dr. Kshitija Kelkar यांचा Chile वेधशाळेत समावेश, अवकाशाचा सखोल नकाशा
abp majha web team | 13 Jul 2025 11:58 AM (IST)
पुण्याच्या खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर क्षितिजा केळकर यांचा चिली येथील वेधशाळेत समावेश झाला आहे. ही वेधशाळा खगोलशास्त्राला नवी दिशा देणारी आहे. चिलीची ही वेधशाळा समुद्रसपाटीपासून दोन हजार सातशे मीटर उंचीवर आहे. अवकाशाचा सखोल नकाशा तयार करणं हे या वेधशाळेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या वेधशाळेत तीन हजार दोनशे मेगापिक्सेलचा उच्च क्षमतेचा कॅमेरा बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याची क्षमता एकावेळेला चाळीस चंद्र टिपण्याची आहे. यामुळे अवकाशातील अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होईल. डॉक्टर क्षितिजा केळकर यांच्या समावेशामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.