Majha Vishesh : राफेल करारात 8.5 कोटींचं गिफ्ट कुणाला? 'राफेल' प्रकरण भाजपसाठी डोकेदुखी ठरतंय?
वृषाली यादव | 06 Apr 2021 06:42 PM (IST)
2016 मध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन आणि भारत सरकारमध्ये करार झाला. या व्यवहारासाठी भारतातल्या दलालांना 8.5 कोटी रुपये गिफ्टच्या स्वरुपात दिल्याचा वृत्तात दावा फ्रान्समधल्या भ्रष्टाचारविरोधी एजन्सीला या व्यवहाराची शंका आल्यानंतर त्यांनी कंपनीचं ऑडिट तपासलं, त्यात ही बाब समोर आली. सारवासारव करताना दसॉल्ट कंपनीनं म्हटलं की विमान कसं आहे दाखवण्यासाठी 50 प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. त्यावर हा खर्च झाला. पण प्रत्यक्षात अशा कुठल्या प्रतिकृती तयारच झाल्या नव्हत्या. मग हे 8.5 कोटी रुपये गेले कुठे ते गिफ्ट होते की लाच?