बिहारमध्ये नितीश कुमार, भाजपला मोठा धक्का? काय म्हणतायत Bihar Election Exit Poll चे आकडे
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2020 09:52 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान संपताच सर्व 243 जागांचे मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील मतदान झाले असून तिसर्या टप्प्यातील 78 जागांवर आज मतदान झाले. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला येईल. अशा परिस्थितीत एबीपी न्यूजने निवडणूक निकालापूर्वी आपल्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी एक्झिट पोल आणला आहे.