Majha Vishesh | 'मंदिरं उघडा' :आंबेडकरांची जीत, बाकीचे चीत?सरकार धर्मस्थळं खुली करणार का? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2020 07:51 PM (IST)
पंढरपूर : लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन अखेर संपलं. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर आणि शिष्टमंडळाने दरवाज्यातून विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले.