#CORONA गृह विलगीकरणात रुग्णाची काळजी कशी घ्यायची? संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं तर, काय करायचं?
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2021 05:51 PM (IST)
मुंबई : कोविड बाधितांच्या गृह विलगीकरण संदर्भात सुधारीत सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. गृह विलगीकरणातील एकूण रुग्णांपैकी किमान 10 टक्के रुग्णांच्या घरी समर्पित वैद्यकीय पथकाने दररोज आळीपाळीने भेटी देवून सर्व बाबींची पडताळणी करावी. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. रुग्णास कोरोना काळजी केंद्र (सीसीसी 2) मध्ये स्थलांतरित करावे. कार्यवाहीला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी.