EVM Protest | Markadwadi ग्रामस्थांचे विधान भवनाबाहेर आंदोलन, पोलिसांकडून धरपकड
abp majha web team | 07 Jul 2025 12:54 PM (IST)
मार्कडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात मुंबईतील विधान भवनाबाहेर आंदोलन केले. विधानसभा निवडणूक निकालानंतर ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या निकालावर आक्षेप घेतला होता. त्यांना ईव्हीएमद्वारे आलेला निकाल मान्य नव्हता. यापूर्वी त्यांनी गावातही मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा उपक्रम राबवला होता, परंतु त्याला मान्यता मिळाली नव्हती. आज पुन्हा हेच ग्रामस्थ विधान भवनासमोर जमले आणि त्यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमकपणे आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेतले. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आम्ही ज्या उमेदवारला मत दिलेलं आहे तो उमेदवार जिंकून आलेलाच नाहीये.” त्यामुळे त्यांना मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची इच्छा आहे. त्यांच्या मते, ईव्हीएममुळे संविधानाचा अपमान होत आहे. विधान भवनाबाहेर अचानक आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. यापूर्वीही त्यांची मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी सरकारने नाकारली होती. आता हे आंदोलन विधानसभेत चर्चेला जावे अशी त्यांची मागणी आहे.