Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सध्या महाराष्ट्राचे लक्ष राज्याच्या विधिमंडळाकडे लागले आहे. त्यातच, औरंगजेबाच्या विषयावरुन नागपुरातील हिंसाचार थांबतो ना थांबतो तोच पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच, दिशाचे वडिल सतिश सालियन यांच्या वकिलानेही आदित्य यांच्यासह काही सेलिब्रिटींवरही गंभीर आरोप केले आहेत. आता, त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्रमध्ये शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. येथील मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांना पहिलाच प्रश्न सध्या सुरू असलेल्या दिशा सालियनप्रकरणावर विचारण्यात आला. त्यावर, आदित्य ठाकरेंनी उत्तर देताना मंत्री नितेश राणेंना (Nitesh Rane) कचऱ्याची उपमा दिली. तसेच, नितेश राणेंचं नाव घेताच... शीsss अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली.
जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत येतं, तेंव्हा भाजपा काही ना काही मुद्दे काढते. मग, औरंगजेब असेल, अबू आझमी असेल आणि आता मी आहे. गेल्या 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच, सत्ताधाऱ्यांकडे व्हिजन नसल्यानेच कुठे तरी विषय भरकटवण्याचं काम केलं जातंय, असेही ठाकरेंनी म्हटले. मुलीच्या वडिलांनीच कोर्टाकडे आता धाव घेतलीय, असे आदित्य यांना विचारले असता प्रश्न कोर्टात आहे, आम्ही कोर्टात बोलू, असे उत्तर आदित्य यांनी दिले. तसेच, कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, 5 वर्षांपासून सातत्याने बदनामीचा प्रश्न सुरू आहे, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, नितेश राणेंचं नाव येताच आदित्य ठाकरेंनी शीsss.. असं म्हणत राणेंच्या प्रश्नावर बोलणं टाळलं.