Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, पण युगानुयुगांच्या परंपरा, चालीरिती, पुरुषसत्ताक समाजपद्धती या सगळ्यांचं स्त्रियांच्या अस्तित्वाभोवती असलेलं ग्रहण काही सुटलं नाही... हेच शारदाताई साठे यांनी हेरलं, त्यातून उभी राहिली स्त्री मुक्ती चळवळ...५० वर्षांपूर्वी या चळवळीची पायाभरणी करताना शारदाताईंना, ज्याेतीताई म्हापसेकर आणि छायाताई दातार यांचीही साथ मिळाली...अबला महिला या उक्तीला या चळवळीने सुरुंग लावला. लाल निशाण या पक्षातून सुरु झालेल्या शारदा ताई आणि छाया ताईंचा एकत्रित प्रवास आजही अविरत सुरु आहे.
भारतातल्या स्त्री मुक्ती चळवळीचा इतिहास मोठा आहे,
काळ बदलला, समाज बदलला, पण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही पूर्णतः बदललेला नाही... म्हणूनच न्याय हक्कांसाठी स्त्रियांचा आवाज होत स्त्री मुक्ती चळवळीने हुंडा विरोधी आंदोलन, मोलकरीण आणि गिरणी कामगार महिलांच्या समस्यांसाठी आंदोलन, देवदासी प्रथा आणि महागाई विरोधी आंदोलन, एक गाव एक पाणवठा आंदोलन, घरगुती अत्याचाराच्या विरोधात, स्त्री शिक्षण, औषध कंपनीतल्या स्त्रियांची कुंचबणा यासारख्या मुलभूत प्रश्नांवर यशस्वी आंदोलनं केली. या चळवळीत केवळ स्त्रियाच नाही तर पुुरुषही स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले...समाजातलं पुरुषभान या चळवळीने जागवलं
५० वर्षांचा प्रवास एका मिनिटात मांडणं म्हणजे, किनाऱ्यावरुन समुद्राची खोली मोजणं आहे, एक मात्र नक्की महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमानाचा अभ्यास या चळवळीशिवाय पूर्ण होणार नाही. हा ५० वर्षांचा क्रांतीकारी अध्याय आज कट्ट्यावर उलगडूया, आपल्या सोबत आहेत स्वतः शारदाताई साठे, विचारवंत लेखिका छायाताई दातार, चयनिका शहा आणि हसीना खान