Sharad Ponkshe Majha Katta | दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त अभिनेते शरद पोंक्षे 'माझा कट्टा'वर
Sharad Ponkshe Majha Katta | दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त अभिनेते शरद पोंक्षे 'माझा कट्टा'वर
विचार करण्याची क्षमता हे निसर्गानं मानवाला दिलेलं सर्वात मोठं वरदान. पण आपल्या या शक्तीचा उपयोग करून स्वतंत्र विचार करणाऱ्या आणि सर्व परिस्थितीत आपल्या विचारांवर ठाम राहणाऱ्या व्यक्ती फारच दुर्मिळ होत चालल्याचं चित्र आपण आजूबाजूला पाहतो.
विशेषतः सध्याच्या वैचारिक कोलांटउड्यांच्या काळात आपल्या 'भूमिकांवर' ठाम राहणारा, सर्व दबाव झुगारून आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी ओळखला जाणारा एक कलावंत 'माझा कट्ट्या'वर आज आपल्या भेटीला आला आहे.
'मी नथुराम बोलतोय' या नाटकाद्वारे महाराष्ट्राला परिचित झालेले, सध्या 'पुरुष' या नाटकाद्वारे नव्या भूमिकेत रंगमंचावर दाखल झालेले, गेली तीन दशकं अनेक चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून मनोरंजन आणि प्रबोधन करणारे, आपल्या वैचारिक आणि राजकीय भूमिकांसाठी चर्चेत असणारे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य जगभर पोहोचवण्याचा वसा घेतलेले, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा सामना करून पुन्हा आयुष्याच्या मंचावरील भूमिका जगण्यासाठी सरसावलेले आणि नुकताच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त झालेले ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत.