Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा
महाराष्ट्रात मिनी विधानसभा अर्थात महानगरपालिकांचा अभूतपूर्व रणसंग्राम सुरु आहे. मतदान आणि मतमोजणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये... प्रत्येक महानगरपालिका महत्वाची आहेच, पण सगळ्यांचं पक्षांचं आणि अवघ्या देशाचं लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे. आशियातल्या सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर आपली सत्ता असावी अशी प्रत्येक पक्षाचीच इच्छा आहे. आणि याच निमित्ताने आजचे कट्ट्याचे पाहुणे आहेत, भाजपच्या मिशन मुंबईमधले एक महत्वाचे सेनापती कॅबिनेट मिनिस्टर आशिष शेलार... आशिष शेलार यांच्या राजकीय कारकीर्दीत मुंबई महानगपालिकेला विशेष महत्व आहे. सुरवातीला नगरसेवक, आमदार आणि नंतर ते भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले. त्यानंतर मुंबईत भाजपाचा महापौर बसवायचा हा चंग त्यांनी बांधला, २०१७ च्या निवडणूकीत भाजपने आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली तरी महापौर पद हुकलं. आता राज्यात तब्बल ९ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतायत.. दरम्यानच्या काळात राज्यातली राजकीय समीकरणं अमुलाग्र बदलली आहेत, मतदारांची मानसिकता आणि डेमोग्राफी बदललीये, ठाकरे बंधुंच्या युतीने विरोधकांसमोरचं आव्हानही वाढलंय... हिंदुत्व आणि मराठी अशा ध्रुवीकरणात कोणाची सरशी होणार? १५० प्लसचा नारा देणारा भाजप पक्ष १३७ जागीच का लढतोय? आयारामांविरुद्ध राज्यभर निष्ठावंतांनी जे बंड केलं ते भाजप कसं शमवणार? आणि मुंबईत महापौर कोण आणि कोणाचा होणार या सगळ्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करुया...