Urmila Matondkar | काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्याशी गप्पा | माझा कट्टा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2019 10:52 PM (IST)
"मी खूप भावनिक आहे, मी लहानपणापासून मितभाषी आहे अशी व्यक्ती राजकारणात योग्य नसते, त्यामुळे मला असं अनेकदा वाटतं की मी चुकीचं क्षेत्र निवडलं आहे", अशा भावना बॉलिवूड अभिनेत्री आणि सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केल्या आहेत. मातोंडकर आज (शनिवार) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अनेक राजकीय गोष्टींवर भाष्य केले. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, "मी सुरुवातीला राजकारणात यायचं ठरवलं होतं. काँग्रेसचीच निवड केली होती. परंतु मी निवडणूक लढण्याबाबत कधीही विचार केला नव्हता. वरिष्ठांनी निवडणूक लढण्यास सांगितले तेव्हा नकारही देता आला नाही. मात्र जेव्हा मी निवडणूक लढण्यास होकार दिला, त्यानंतर खूप मेहनत केली आहे."