नागपूरचे 'ऑक्सिजन मॅन' प्यारे खान! रिक्षा चालवली, संत्री विकली,आज समाजासाठी करतायेत कोट्यवधींचा खर्च
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2021 10:46 PM (IST)
मुंबई : सध्या कोरोनाच्या संकटात अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या कामातून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना संकटात कसलीही तमा न बाळगता नागपूरच्या प्यारे खान यांनीही मदतीचा हात पुढे केला. नागपूरमधील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्यारे खान यांनी आतापर्यंत तब्बल 85 लाख रुपये खर्च केले आहे. असे मोठ्या मनाचे प्यारे खान आज एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एक दहावी नापास रिक्षाचालक ते 400 कोटींची उलाढाल असलेले व्यावसायिक त्यांचा हा यशस्वी प्रवासही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.