श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्याशी बातचीत | माझा कट्टा
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2021 11:15 PM (IST)
मुंबई : राम मंदिराच्या निर्मितीच्या निधी संकलनाला आता सुरुवात झाली आहे. जनतेच्या सहभागातून राम मंदिर उभारण्याचा राम मंदिर न्यायासा मानस आहे. असा निधी कॉर्पोरेटद्वारे उभा करणे आम्हाला सहज शक्य होतं. तसेच काही कुटुंबांनी राम मंदिर आम्ही उभारतो असा प्रस्तावही आम्हाला दिला होता. मात्र एवढं महान कार्य कुणा एका कुटुंबाच्या हातून होणे आम्हाला रुचणारं नव्हतं. संपूर्ण भारत देशातील आणि जगभरातील राम भक्त राम मंदिर निर्मितीत सहभागी व्हावे आणि त्यांनाही समाधान मिळावे, या उद्देशाने आम्ही निधी गोळा करुन राम मंदिराची निर्मिती करत आहोत, असं राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं. ते आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.