Majha Katta | फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2020 11:50 PM (IST)
माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा छोटा भाग आहे. माझा व्यवसाय माझं आयुष्य नाही. मग मी जे पाहतो, वाचतो त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. म्हणून फक्त लेखक, कलाकारांनीच नाही तर भूमिका प्रत्येकानेच घ्यावी, असे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. आयुष्य जगताना तुमच्या आजूबाजूची लोक महत्वाची आहे. त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात अतुल कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.