Kapil Dev Majha Katta : विश्वविजेते कर्णधार कपिल देव 'कट्ट्या'वर : ABP Majha
abp majha web team | 31 Dec 2021 10:59 PM (IST)
1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. या विजयाच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. दरम्यान या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी या भव्य विजयानंतरही दोन गोष्टींची खंत कायम मनात राहिल्याचं आवर्जून सांगितलं...