#Maratha मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही - अशोक चव्हाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2020 10:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटलंय. नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती वकील मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधिशांना केली. या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधिशांनी सांगितले. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्यासंदर्भात सरकारकडून तिसऱ्यांदा लेखी अर्ज सादर करण्यात आला आहे.