Pravin Darekar | शिवसेनेला भगव्या रंगाचं पेटंट दिलंय का? प्रवीण दरेकरांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2020 07:37 PM (IST)
मुंबई : शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला दिलं. तसंच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. एबीपी माझाशी संजय राऊत यांनी एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिकेसाठी भाजपने 'मिशन मुंबई' सुरु केलं आहे. याबाबत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.