'राज्यपालनियुक्त आमदारांची यादी फेटाळण्याचं फिक्स',हसन मुश्रीफ यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2020 08:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी आज (2 नोव्हेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत, अन्यथा पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.