Saif Ali Khan apology | 'सीताहरणा'संबंधी केलेल्या वक्तव्यानंतर सैफ अली खानचा अखेर माफीनामा
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2020 06:58 PM (IST)
सीताहरणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या एका वक्तव्यानंतर सैफ अली खानवर सोशल मीडियातून मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने म्हटलं आहे की, "आगामी आदिपुरुष या चित्रपटात मी रावणाची भूमिका साकारतोय. आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचं एक दयाळू आणि मानवतावादी रुप प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापलं होतं. त्यांनंतर त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं. रावणाच्या या भूमिकेला चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत."