Ban on Diwali Crackers? फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात मांडण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Nov 2020 06:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.