जामीन न मिळाल्याने अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी, अर्णबविरोधात जेलबाहेर जोरदार घोषणाबाजी
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2020 07:51 PM (IST)
अलिबाग : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. कारागृह विभागाचे पोलिस महानिरीक्षकांनी याबाबत आदेश दिले असल्याची माहिती अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे. अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं.