Anil Deshmukh : पोलीस बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते, तीच यादी मुख्य सचिवांना दिली
abp majha web team | 02 Feb 2022 08:50 PM (IST)
Anil Deshmukh : राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे.