Anandache Paan : रामायणात हरवलेली उर्मिला पुस्तकरुपात! लेखिका Dr. Smita Datar यांच्यासह खास गप्पा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआनंदाचे पानच्या या नव्या आणि विशेष भागात तुमचं स्वागत, आजचा भाग विशेष का हे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात कळेलच.. पण सुरुवात करुया आजच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पुस्तकांपासून आपण रामायणाचा विचार करतो, तेव्हा रामायणातल्या ज्या प्रमुख स्त्रियांचा विचार होतो, त्यात लक्ष्मणपत्नी उर्मिलाचा फार विचारच होत नाही..त्या उर्मिलेवर एक कादंबरी नुकतीच लिहीली गेलीय, कादंबरीचं नाव आहे उयोध्येची उर्मिला – लेखिका स्मिता दातार यांनी खूप अभ्यास करुन ही कादंबरी लिहीली आहे, तेव्हा डॉ दातार यांच्याशी गप्पा मारुया आज आणखी एका खूपच वेगळा अनुभव देणारं पुस्तक आहे त्याविषयीदेखील गप्पा मारायच्यात, पुस्तकाचं नाव आहे वॉकिंग ऑन द एज – प्रसाद निक्ते यांच्या सह्याद्रीतील ७५ दिवसांच्या भटकंतीचा अनुभव आपण त्यांच्याकडूनच ऐकूया आज पुस्तकप्रेमींसाठी एक सरप्राईज आहे कार्यक्रमाच्या पुढच्या भागात – पण आता वेळ झालीय एका छोट्या विश्रांतीची ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत..आज आपल्या टॉप ५ सदराबरोबर एक प्रश्नमंजुषा घेऊन येतायत, राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी.