712 | जळगाव | कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2018 08:31 AM (IST)
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याआधीच बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. फुलोरा अवस्थेपासूनच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र त्यात आता मर रोगाचीही भर पडलीये. पाण्याचा जास्त ताण पडल्यास किंवा जास्त काळ शेतात पाणी साचून राहील्यास कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जळगावमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलाये.80818