You Tube Video Guidelines : सोशल मीडियावरील (Social Media) YouTube हा सर्वात लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर लाखोंच्या संख्येने व्हिडीओ अपलोड केले जातात. मात्र, आता 90 लाखांहून अधिक व्हिडीओ यू टूयुबवरून काढून टाकण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या विरोधात यु ट्यूबने कारवाई केली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम भारतात दिसून आला आहे. भारतातील तब्बल 22.5 लाखांहून अधिक व्हिडीओ यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आले आहेत.यूट्यूबच्या गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्या कारणाने यू ट्यूबने ही कारवाई केली आहे.     

नुकताच गुगलचा ट्रान्सपरन्सी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 मधील आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, ज्या ज्या यू ट्यूबर चॅनलने यु ट्यूबच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या नाहीत असे तब्बल 90 लाखांहून अधिक व्हिडीओ काढून टाकले आहेत.

गुगलच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये एकूण 30 देशांमध्ये भारतातून सर्वाधिक व्हिडीओ काढून टाकण्यात आले. यानंतर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिंगापूर पाठोपाठ अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे हे व्हिडीओ काढले आहेत. 

क्र. देश डिलीट व्हिडीओंची संख्या 
1. भारत  22,54,902
2. सिंगापूर 12,43,871
3. अमेरिका 7,88,354
4. इंडोनेशिया 7,70,157
5. रूस 5,16,629
6. ब्राझील 4,75,118
7. पाकिस्तान 2,12,770
8. बांग्लादेश 1,52,051
9. जर्मनी 1,14,129

YouTube कम्युनिटी गाईडलाईन्स

YouTube वर नेहमीच कम्युनिटी गाईडलाईन्सचा एक संच असतो ज्यामध्ये YouTube वर कोणत्या प्रकारचा कंटेंट गेला पाहिजे आणि कोणता नाही याबाबत माहिती देतो. ही बाब यू ट्यूब प्लॅलफॉर्मवरील फक्त व्हिडीओच्या बाबतीतच नाही तर फोटो, कमेंट्स, लिंक्,स आणि रिल्सच्या बाबतीतही लागू होते. 

YouTube कम्युनिटी गाईडलाईन्सनुसार या गोष्टींवर कारवाई केली जाते 

स्पॅम कंटेंट : फेक कंटेंट 

संवेदनशील कंटेंट : मुलांची सुरक्षा, नग्नता आणि लैंगिक सामग्री, आत्महत्या किंवा स्वत: ला इजा आणि आक्षेपार्ह भाषा.

हिंसक आणि धोकादायक कंटेंट : शोषण आणि सायबर धमकी, देशद्रोही भाषण, हिंसक गुन्हेगारी संघटना आणि हिंसक ग्राफिक कंटेंट.

सरकारच्या नियंत्रणाखालील वस्तू : बंदुक आणि अवैध वस्तूंची विक्री.

दिशाभूल करणारी माहिती : निवडणूक आणि वैद्यकीय माहितीसह दिशाभूल करणारी माहिती.

ही सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वे मानवी पुनरावलोकन आणि मशीन लर्निंगच्या संयोजनाचा वापर करून लागू केली जातात. कंपनीची मार्गदर्शक तत्त्वे सर्व निर्मात्यांना लागू होतात.

महत्त्वाच्या बातम्या :

Apple WWDC Event 2024 : Apple चा सर्वात मोठा इव्हेंट 'या' तारखेला होणार; Apple iOS 18, iPadOS 18सह अनेक गोष्टी असतील खास