मुंबई : Xiaomi एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.  ज्याचे नाव Redmi A3 असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या फोनबद्दल चर्चा होत होत्या, पण आता Xiaomi च्या या आगामी फोनचे डिझाइन रेंडर लीक झाले आहे. ज्यामुळे या फोनचे नवे डिझाईन देखील समोर आले आहे. या Xiaomi च्या नवीन फोनच्या डिझाईन, लीक स्पेसिफिकेशन्स आणि संभाव्य लॉन्च डेट विषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


डिझाईन झालं लीक


Redmi A3 हे Xiaomi च्या आधीच्या स्मार्टफोन Redmi A2 चे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे.  Redmi A3 चे डिझाईन रेंडर लीक झाले आहे. ज्यावरुन असे दिसून येते की Xiaomi चा हा फोन काळा, निळा आणि हिरवा अशा तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन आफ्रिकन मार्केटच्या पोस्टरच्या माध्यमातून समोर आला आहे.


डिझाईन झालं लीक


Redmi A3 हे Xiaomi च्या आधीच्या स्मार्टफोन Redmi A2 चे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे.  Redmi A3 चे डिझाईन रेंडर लीक झाले आहे. ज्यावरुन असे दिसून येते की Xiaomi चा हा फोन काळा, निळा आणि हिरवा अशा तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन आफ्रिकन मार्केटच्या पोस्टरच्या माध्यमातून समोर आला आहे. लीक झालेल्या डिझाईनवरून असे दिसून येते की या फोनच्या मागील बाजूस ग्लास बॅक डिझाइन असेल आणि चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल.या फोनच्या लीक स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील सविस्तर जाणून घेऊयात. 


Redmi A3 चे स्पेसिफिकेशन्स लीक झालेत


या फोनमध्ये 6.71 इंच LCD डिस्प्ले असू शकतो.  जो HD Plus रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट, 400 nits ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येऊ शकतो. या फोनमधील प्रोसेसरसाठी MediaTek SoC असलेला कोणताही चिपसेट वापरला जाऊ शकतो. या फोनमध्ये 4GB रॅम, 128GB स्टोरेज आणि मेमरी कार्ड स्टोरेज देखील दिले जाऊ शकते. हा फोन Android 13 (Go Edition) ऑपरेटिंग सिस्टमवर चालू शकतो.


फोनच्या मागील भागात 13MP प्राथमिक कॅमेरा, AI लेन्स आणि LED लेन्स दिले जाऊ शकतात. याशिवाय फोनच्या पुढील भागात 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.


ही बातमी वाचा : 


Goodbye Nokia: 'नोकिया'ची गोष्ट पुन्हा एकदा संपणार? आता 'हे' स्मार्टफोन नव्या नावाने विकले जातील