ICC World Cup 2023 Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांचं लक्ष आज (ICC World Cup 2023 Final) वर्ल्डकप मॅचकडे आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या मॅचसाठी उत्सुक आहे. अनेक ठिकाणी अनेक उपक्रम सुरु दिसत आहे. त्यातच गुगलनेदेखील भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मॅचसाठी खास डुडल तयार केलं आहे. सगळ्याच देशांचं लक्ष आज क्रिकेटकडे लागलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघ भारी पडतो कि ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकपवर आपलं नाव कोरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आज तयार करण्यात आलेल्या या डूडलमध्ये गुगलने पिच, स्टंप्ससह क्रिकेटच्या मैदानाचे सीन दाखवले. सीमारेषा, प्रेक्षक, आकाश आणि फटाक्यांची आतषबाजी वगैरे दाखवली. त्यासोबतच अवकाशदेखील दाखवण्यात आलं आहे. वेगळ्या स्टाईलने क्रिकेटचं साहित्य वापरुन गुगल लिहिण्यात आलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. गुगल डूडल नीट पाहिलं तर लक्षात येईल की, वर्ल्डकपट्रॉफी गुगलच्या दुसऱ्या O मध्ये दिसत आहे, तर गुगलकडे L ची जागी बॅटने घेतली आहे. गुगल डूडलवर क्लिक करताच गुगल तुम्हाला एका नव्या पेजवर घेऊन जाईल जिथे तुम्हाला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या फायनल मॅचशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळेल.
दोन्ही संघात 150 वेळा सामने...
ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणेच भारत आपल्या समोरच्या प्रत्येक संघावर वर्चस्व गाजवत असल्याचे यावेळी दिसून येत आहे. वनडेमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 150 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने 57 आणि ऑस्ट्रेलियाने 83 सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये वर्ल्डकपमध्ये तेरा सामने झाले. भारताने पाच वेळा तर ऑस्ट्रेलियाने आठ वेळा विजय मिळवला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला आज दुपारी 2 वाजता सुरुवात होणार असून, या सामन्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त इतर अनेक व्हीआयपी स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत.
VIPs पाहणार महामुकाबला...
गृहमंत्री अमित शाहदेखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला येणार आहेत.ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्ससुद्धा उपस्थित राहणार आहेत. सचिन तेंडुलकरदेखील हजेरी लावणार आहे. कपिल देवदेखील येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित असणार आहेत. टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील उपस्थित असेल. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील सामना पाहायला येणार आहेत. शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंहदेखील हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफदेखील सामना पाहायला उपस्थित असतील.
इतर महत्वाची बातमी-