WhatsApp Update :   व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अ ॅप आहे. जगभरात या अॅपचे 2 अब्जांहून अधिक युजर्स आहेत. युजर्सला व्हॉट्सअॅप वेळोवेळी अॅपमध्ये अपडेट्स आणत असते. काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने युजर्सना अॅपमध्ये व्हिडीओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअर करण्याची सुविधा दिली होती. आता कंपनी आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे जे सध्या काही बीटा टेस्टर्ससह उपलब्ध आहे.


व्हिडिओ कॉलदरम्यान ऑडिओ आणि व्हिडीओ शेअर करण्याची परवानगी


खरं तर व्हॉट्सअॅप युजर्सला व्हिडिओ कॉलदरम्यान ऑडिओ आणि व्हिडीओ शेअर करण्याची परवानगी देणार आहे. म्हणजेच युजर्स व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रीन शेअरदरम्यान व्हिडीओ आणि ऑडिओ दोन्ही शेअर करू शकतील आणि कॉलमध्ये सामील असलेले लोक ते ऐकू शकतील. यापूर्वी व्हिडिओ कॉलदरम्यान फक्त स्क्रीन शेअर मिळत होता. 


सध्या हे अपडेट अँड्रॉइड बीटा टेस्टर (Android 2.23.26.18) सोबत उपलब्ध आहे. येत्या काळात कंपनी ते सर्वांसाठी रोलआउट करू शकते. व्हॉट्सअॅपच्या अपडेट्स लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाईटने या अपडेटची माहिती शेअर केली आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ शेअर पर्याय तेव्हाच काम करतील जेव्हा आपला व्हिडिओ चालू असेल. डिसेबल झालं तर फिचर चालणार नाही.  त्यामुळे हे फिचर वापरायचं असेल तर व्हिडीओ ऑन ठेवावा लागणार आहे.


या फिचरवरही सुरु आहे काम 


व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे युजरनेम फीचर. या फीचरच्या मदतीने तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये एकमेकांना अॅड करू शकाल. युजरनेम फीचर इन्स्टाग्राम सारखेच असेल जिथे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे नाव असेल. अलीकडेच कंपनीने WhatsApp मध्ये ईमेल लिंक आणि मल्टीअकाऊंट फीचरला सपोर्ट केले आहे. तुम्ही आता एकाच अॅपवर 2 अकाऊंट चालवू शकता.


स्टेटस अॅप देखील होणार अपडेट 


सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये असे काय होते की, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते.पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


X Down : जगभरात ट्विटर X ठप्प! पोस्ट करण्यात अडथळा, नव्या पोस्टही दिसेना; नेटकरी हैराण!