X Server Down : प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप ट्विटर म्हणजेच आताचं X  ची सेवा जगभरात ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक युझर्सला एक्स वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे. अचानक एक्स डाऊन झाल्यामुळे नेटकरी चांगलेच हैराण झाले आहेत. प्लॅटफॉर्म एक्स आणि एक्स प्रोमध्ये गुरुवारी पहाटे जागतिक स्तरावर बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. जगभरात कोट्यावधी लोकांना ट्विटर म्हणजेच एक्स डाऊन झाल्याने पोस्ट करण्यात अडथळे येत होते, पोस्ट, मेसेज दिसत नव्हते. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक वेळा ट्विटर डाऊन झाल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक कारणामुळे एक्स डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 


अनेक नेटकऱ्यांना पोस्टही दिसेना! 


जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक वेळा ट्विटर डाऊन झाल्याचं समोर आलं आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर एक्सचा सर्व्हर मागील एक तासापासून डाउन झालं आहे. ट्विटर वापरण्यात अडथळे येत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांना पोस्ट दिसत नाही आहे. तर अनेकांना कोणतंही ट्वीट करता येत नाही आहे. 


47,000 पेक्षा जास्त अमेरिकन वापरकर्त्यांना अडथळा! 


DownDetector या साईटने दिलेल्या माहितीनुसार, 47,000 पेक्षा जास्त अमेरिकन वापरकर्त्यांना एक्स आणि एक्स प्रो वर पोस्ट करण्यास किंवा पोस्ट बघण्यात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेसोबतच बाकी देशातील वापरकर्त्यांनादेखील एक्स जाऊन असल्याने समस्यांचा सामना करावा लागला. याच वेबसाईटने सांगितल्या नुसार पहाटे ट्विटरमध्ये म्हणजेच एक्समध्ये बिघाड झाल्याचं दिसून आलं आहे. 


कारण अस्पष्ट


ट्विटरची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ट्विटर डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे ट्विटर अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत होते. भारतात ट्विटर युजची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर ट्विटर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम होत असतो. ट्विटर ठप्प होण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी देखील ट्विटर डाऊन झाले होते.  


X वरील  ब्लॉक केल्या 36 हजार लिंक्स


सोशल मीडिया आणि वेबसाईट संदर्भात सरकार (Social Media) सातत्याने कठोर पावलं उचलत असते. नुकतेच सरकारने मोठे पाऊल उचलत X वरील  एका झटक्यात 36 हजारांहून अधिक लिंक्स ब्लॉक केल्या आहेत. खरं तर सोशल मीडियावरील पोस्ट पाहून ही कारवाई करण्यात आली आहे. अशा लिंकची आधी ओळख पटविण्यात आली आणि त्यानंतर त्यावर कडक कारवाई करून हे पाऊल उचलण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया कंपनीचे 36,838 यूआरएल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.


इतर महत्वाची बातमी-


पासवर्ड सेफ ठेवण्यासाठी तुम्ही 'या' अॅपचा वापर तर नाही करत? संपूर्ण डेटा होऊ शकतो लीक